उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबानी उद्योगसमूहाच्या सुरुवातीच्या प्रवासावर भाष्य करत दिलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं, “धीरूभाई अंबानी पंपावर काम करत होते. तेथेच ते पेट्रोल चोरायचे, आणि तिथूनच त्यांनी मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं.” (“Dhirubhai Ambani Became a Billionaire by Stealing Petrol” – Ajit Pawar’s Statement)
पवार पुढे म्हणाले, “काही लोक धंदा कुठूनही सुरू करतात, छोट्या मार्गांवरून मोठं स्वप्न पूर्ण करतात.” त्यांच्या या विधानाचा उद्देश प्रेरणा देणारा असला तरी ‘पेट्रोल चोरी’चा उल्लेख केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सामान्य जनतेपासून सोशल मीडियापर्यंत या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.