विशेष प्रतिनिधी
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय काहीही कांगावा करत असले तरी सीसीटीव्ही फुटेजमुळे रुग्णालय प्रशासनाचा खोटेपणा उघड झाला आहे. गर्भवती तनिषा भिसे याना रुग्णालयात साडे पाच तास थांबवून ठेवले आणि उपचारही नाकारल्याचे समोर आले आहे. ( Dinanath Mangeshkar Hospitals lies exposed CCTV reveals Tanisha Bhisena was kept waiting for five and a half hours)
डिपॉझिटअभावी उपचार न करणाऱ्या आणि गरोदर महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असणाऱ्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात सध्या जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त धनंजय केळकर यांनी भिसे यांच्या नातेवाईकांना मी स्वतः जमेल तेवढी रक्कम भरा असे सांगितले होते. मात्र, तरीसुद्धा ते कोणालाही न सांगता ते निघून गेले, असा दावा केला होता. मात्र आता सीसीटीव्ही फुटेजमुळे केळकर यांचा खोटेपणाही उघड झाला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असले तरी रुग्णालयावर थेट कारवाई करता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांना याबाबत अहवाल अहवाल देण्यास सांगितले आहे.
प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपये भरण्यासाठी सांगितले. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच ते तीन लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. तिच्यावरती उपचार सुरू केले नाहीत. याबाबत आरोप झाल्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे.
या अहवालात पैसे मागितले नाहीत असे म्हटले आहे. मात्र भिसे कुटुंबीयांने मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप घेत हा अहवाल साफ खोटा आहे. त्यादिवशी आम्ही पैसे देत होतो, तीन ते चार तास आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो, सीसीटीव्ही चेक करा, अशी मागणी केली होती.