विशेष प्रतिनिधी
पुणे : हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली नाही तर ड्रायव्हरनेच रसायनांचा स्फोट घडून आणला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सह कर्मचारी त्रास देत होते म्हणून त्याने हे कृत्य केले. मात्र यामध्ये चौघांचा बळी गेला तरी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नसून खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
( Driver sets fire to protest salary cut, shocking information about Hinjewadi fire incident)
जनार्दन हंबर्डीकर असे या चालकाचे नाव आहे. तिघांशी वाद होता. त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. बसमध्ये एकूण 12 कामगार होते.
हिंजवडी मधील ती घटना अपघात नसल्याचे समोर आले आहे. या घटनेत स्वत: चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली आहे.