विशेष प्रतिनिधी
पुणे : एनआयबीएम रोडवरील आरआयएमएस स्कूलजवळ एक धक्कादायक अपघात घडला. एका मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने डिव्हायडरला धडक दिली. त्यानंतर गाडी डिलिव्हरी मॅनच्या सुझुकी बर्गमन दुचाकीवर घातली. ( Drunk driver loses control of vehicle, hits delivery man’s bike)
दुचाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्यातील सर्व डिलिव्हरीचे सामानही नष्ट झाले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.