पुणे : स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या १२ जणांना पुण्यातील सदाशिव पेठेत एका भरधाव वेगाने चाललेल्या कारने उडविले. शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजता सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ ही घटना घडली.अपघातात जखमी झालेले सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारे होते. या विद्यार्थ्यांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. ( Drunk driver runs over twelve studentsincident in Sadashiv Peth)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कॅब चालकाने मद्यप्राशन केले होते. चालक हा पुण्याचा असून त्याचे नाव जयराम शिवाजी मुळे असे आहे. तो समर्थ नगर कॉलनी बिबेवाडी येथील रहिवासी आहे.
शनिवारी सायंकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ असलेल्या नाथसाई या चहाच्या दुकानात सर्व विद्यार्थी चहा घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या टुरिस्ट गाडी हुंडाईने या १२ जणांना उडवले. विश्रामबाग पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सर्व जखमींना संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.