uday samantशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय सामंत त्यांना धक्का देण्याच्या तयारीत होते. उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत, असे सांगत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ( Eknath Shinde was about to be given a shock by Uday Samant, Sanjay Raut’s claim of a political earthquake in the state)
पालक मंत्री पदावरून महायुतीत नाराजी नाट्य सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावी आहेत. यावर राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दावोसला नेलेयं. उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले. आता एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, तसं ते गावी जातात. त्यामुळे नाराजीचं कारण आम्हाला कळलं पाहिजे. शिवसेना संपली नाही, ती संपणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ती पुन्हा उसळेल. ही भाजपाची कुटनीती आहे, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असलेल्यांना ते उद्ध्वस्त करतात.
ते म्हणाले, एकनाथ शिंदेंचे गाव दरे हे त्यांचं दावोस आहे. तिथे जाऊन ते पक्षात, कुटुंबात आणि uकार्यकर्त्यांमध्ये गुंतवणूक आणतात. एकनाथ शिंदे कायम अस्वस्थ असतात. त्यांनी आता नागा साधूंबरोबर कुंभमेळ्यात जाऊन बसायला हवं. नागा साधूही अस्वस्थ असतात. अघोरी विद्या करतात, नाचतात, तंबूत बसतात. कोणी आयआयटीवाला बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. त्यामुळे अस्वस्थ मंत्र्यांनी कुंभमेळ्यात ध्यानधारणा करावी.
उदय सामंत दावोसला गेले आहेत. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंतांना दावोसला नेलेयं. उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले.
सैफचा हल्लेखोर बांगलादेशी, हा राजकीय दावा असल्याचा करताना राऊत म्हणाले, पोलिसांचा दावा हा राजकीय दावा आहे. जर बांगलादेशी या मुंबईत घुसले असतील आणि ते अशाप्रकारचे गुन्हे करत असतील तर याला नरेंद्र मोदींचं सरकार जबाबदार आहे. दिल्लीत, पश्चिम बंगाल, मुंबईमध्ये बांगलादेशी आहेत. बांगलादेशी चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित असलेल्या सैफ अली खानच्या घरावर हल्ला करतो. हा सर्व प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडताय. त्यामुळे हा भाजपाचा डाव आहे, असं मी म्हणेन.