विशेष प्रतिनिधी
पुणे: बक्षीस देण्याचा बहाणा करून एका ज्येष्ठ महिलेचे ७५ हजारांचे सोन्याचे गंठन लांबवल्याची घटना खडकी बाजार येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Elderly woman cheated by asking her to keep a gold chain in a bag on the pretext of a prize)
सुलोचना ओव्हाळ (वय ७०, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओव्हाळखडकी बाजार येथील कसाई मोहल्ला भागात राहण्यास आहेत. गुरुवारी (दि.१०) पाऊणच्या सुमारास त्या खडकीबाजार येथील कर्नल भगत शाळेसमोरील रस्त्यावरून जात होत्या. त्यावेळी अनोळखी चोरटा त्यांच्या जवळ गेला. त्याने फिर्यादी महिलेला बोलण्यात गुंतवले. तसेच बक्षीस देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला गळ्यातील सोन्याचे गंठण पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तिला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने गंठण लांबविले. त्यानंतर चोरटा तिथून पसार झाला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक देठे तपास करीत आहेत.