विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : हिंदू समाजाने हे सरकार निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांना पहिले प्राधान्य दिले जाईल. सरकार हिंदूंच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल हिंदू समाजाने एकजूट राखली पाहिजे असे आवाहन मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले..
सिंधुदुर्ग येथे आयोजित हिंदू परिषदेत बोलताना मंत्री नितेश राणे यांनी हिंदुत्व आणि हिंदू समाजाच्या हितरक्षणाचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मी येथे हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आलो आहे. मी मंत्री आणि आमदार असलो तरी त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मी हिंदू आहे. भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि तो तसेच राहील.भारतामध्ये ९०% हिंदू लोकसंख्या आहे, त्यामुळे हा देश हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जावा. हिंदू समाजाच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
इतिहासातील इस्लामिक हल्ल्यांचा संदर्भ देत त्यांनी हिंदू मंदिरांच्या रक्षणाची गरज व्यक्त करताना राणे म्हणाले जे जिहादी आमच्या मंदिरांच्या जमिनींवर हक्क दाखवत आहेत, त्यांना धडा शिकवावा लागेल. लव्ह जिहाद आणि वक्फ बोर्डासारख्या प्रकरणांत आम्ही सकल हिंदू समाज म्हणून उभे आहोत.
सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील हिंदू मंदिरांच्या जतनासाठी आवश्यक निधी दिला जाईल.मालवणमधील शिवराजेश्वर मंदिराचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल.झाराप येथील अतिक्रमण प्रकरणी संबंधित स्टॉलवर कारवाई केली जाईल.पालकमंत्री म्हणून तालुकानिहाय दौरे करून हिंदू समाजाच्या गरजा जाणून घेतल्या जातील. आपली एकजूट हवी, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आवाहन त्यांनी केले.