विशेष प्रतिनिधी
नागपूर : निवडणूक आयोगाने (भाजपच्या फायद्यासाठी मतांवर दरोडा टाकला. भाजपच्या फायद्यासाठी सुरू असलेले काम लोकशाहीसाठी घातक आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.)
वडेट्टीवार म्हणाले, आज मतदार दिवस म्हणून आंदोलन करत आहे. मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने निवडणूक आयोग स्वायत्त राहिले नाही. निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून वागतात. 2019 नेते 2024 पाच लाख मतदान वाढल. पण अचानक विधानसभा निवडणुकीत म्हणजे 6 महिन्यात 5 लाख मतदान वाढले. 76 लाख मतदान वाढले याचा खुलासा निवडणूक आयोगाने केला नाही हे संशयास्पद आहे. काहीतरी या संदर्भात गडबड आहे. वाढीव मताचे पुरावे दिले नाही.
एसटी दरवाढीवर टीका करताना ते म्हणाले, एसटी सेवा गरिबांची आहे. एसटी गरिबांची रक्तवाहिनी म्हणून काम करते. आता एसटी लाडकी बहीण नंतर तोट्यात कशी गेली एसटीमध्ये झालेला भ्रष्टाचार वाढला होता. त्याला सरकार खतपाणी घालत असल्यानं तोटा वाढत आहे. दरवाढ म्हणजे गरीब माणसाची लूट आहे, दरोडा मोठ्यांवर टाका, गरिबांचा खिशाला भोक पडली असताना असे काढणे याचा निषेध करतो, गरिबांसाठी सद्बुबुद्धी सरकारला द्यावी.
वीज दरवाढही एक प्रकारे लूट असल्याचा आरोप करताना ते म्हणाले, 2300 रुपयाचे स्मार्ट मीटर 12 हजार रुपयाने लावले जात आहे. अर्ध्या रात्री रिचार्ज संपला तर लाईन बंद होईल, प्रीपेड मिटर हे गतीने फिरणारे मीटर आहे. कोणाच्या फायद्यासाठी मीटर लावू नये.
वाल्मीक कराड यांच्या संपत्तीबाबत ते म्हणाले, आतापर्यंत ईडीची एन्ट्री याप्रकरणात का झाली नाही? आता सरकार त्याला आशीर्वाद देणाऱ्यावर काय करते, आकाची प्रॉपर्टी जप्त होईल हे मंत्री पदावर आहे
आता जरांगे यांच्या आंदोलनांना धार राहिली नाही, असा टोला मारताना वडेट्टीवार म्हणाले, वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचे आहे, पण कोर्टात पुर्वी प्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. ओबीसी समाज हे सहन करणार नाही. 50 हजार जागा ओबीसींच्या हक्काच्या आहेत
शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय अमित शाह यांना समाधान मिळत नाही. धण्यातून उत्त्पन्न वाढल आणि धान्याची गोडाऊन भरून वाहत आहेत हे शरद पवार यांच्यामुळे आहे. शेती प्रक्रिया पवार यांच्या काळात वाढली. पंजाबराव देशमुख नंतर शरद पवार यांचा योगदान मोठं आहे.