विशेष प्रतिनिधी
पुणे : सावित्राईबाई फुले विद्यापीठात इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. गेटवरून आतमध्ये सोडत नसल्याने मुख्य गेट तोडून विद्यार्थी आतमध्ये वसले. निकालात घोळ असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या मांडून बसले आहेत. आमची परीक्षा पुन्हा घ्या अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडले जात नव्हते. अखेर आक्रमक होऊन विद्यार्थ्यांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला आहे.
( Engineering students protest at Savitrabai Phule University)
शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या मांडून बसले आहेत. त्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. आम्ही आता इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. निकालात बराच घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू खाली येऊन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाहीत. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
कुलगुरू आमचे ऐकूनच घेत नाहीत. एवढे दिवस आम्ही पुन्हा परीक्षेची मागणी करतोय. ते अजूनही खाली आले नाहीत. २०२२ साली सुद्धा अशा प्रकारे गोंधळ झाला होता. त्यावेळी कॅरी ऑनकंची मागणी करण्यात आली होती. आता आम्ही पुन्हा परीक्षेची मागणी करत आहोत. पण तेही विद्यापीठ मान्य करत