मुंबई : देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही, असा संताप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याविरोधात व्यक्त केला.
( Even a true Muslim will not forgive the traitor , angered Eknath Shinde)
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे विधान केले आहे. आझमी यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनीच सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही काळ कामकाज चालल्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले. मात्र त्याआधी विधान परिषदेत भाजपा गटनेते प्रवीण दरेकर आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली.
देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही. देशाभिमानी मुसलमानांशी आपला वाद आहे का? राष्ट्रभक्त मुसलमानांसोबत वाद आहे का? छत्रपती संभाजी महाराजांचा वध करणं, हलाल करून त्यांची चामडी सोलणं आणि त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगला माणूस म्हणणं, चांगला प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले.
शिंदे म्हणाले की, अबू आझमी यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील अवमानकारक वक्तव्य केलं आहे. अबू आझमी हे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करतात. त्यामुळे त्यांच्यावर आपल्याला कारवाई करायचीच आहे. कारण अबू आझमी औरंगजेबाला कुशल प्रशासक म्हणतात. औरंगजेबाने काशी विश्वेश्वराच्या मंदिरासह अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. महाराष्ट्रामध्ये आया बहिणींवर अत्याचार केले. नद्यांमध्ये रक्ताळलेलं प्रेत वाहत होते. अनेकांचे धर्मांतर केले. मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले. त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमाण करणे म्हणजे देशद्रोहीसारखे आहे. म्हणून या देशद्रोह्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंग सोलले, त्यावर मीठ टाकले. चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा आणि आपल्या देशभक्तीचा अपमान आहे. त्यामुळे मी एवढेच सांगतो,
देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा था।।”
अशी शेरो शायरी शिंद यांनी केली.