विशेष प्रतिनिधी
मुंबई : खासगी विमान कंपनीतील एअर होस्टेसने डोंबिवलीचा प्रसिद्ध रील स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे, याप्रकरणी सुरेंद्र पाटील याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एअरपोर्टवर नोकरी लावून देतो, असं सांगून सुरेंद्र पाटीलने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. गुन्हा दाखल होताच सुरेंद्र पाटील हा फरार झाला आहे. (Famous reelstar Surendra Patil sexually assaults Pune air hostess)
सुरेंद्र पाटील याच्याविरोधात याआधीही काही गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस स्टेशनच्या आत रील्स बनवल्याप्रकरणी सुरेंद्र पाटील याला याआधीही अटक करण्यात आली होती, पण आता सुरेंद्र पाटील याच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप झाले आहेत.
सुरेंद्र पाटील याचे रील्स पाहून तरुणीने त्याच्यासोबत मैत्री केली, यानंतर मुंबई एअरपोर्टवर नोकरी मिळवून देतो, असं आमिष दाखवून सुरेंद्र पाटीलने तरुणीवर अत्याचार केले. तसंच बंदुकीचा धाक दाखवून कुणाला सांगितलं तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार तरुणीने दिली. तरुणीच्या या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी सुरेंद्र पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सुरेंद्र पाटील फरार झाला आहे.
सुरेंद्र पाटील याच्यावर अत्याचाराचे आरोप करणारी पीडित तरुणी पुण्याची असून ती खासगी विमान कंपनीमध्ये एअर हॉस्टेस होती. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीला सुरेंद्र पाटीलचा रील दिसला, या रीलला तिने लाईक केलं, त्यानंतर सुरेंद्र पाटीलने तिच्यासोबत संपर्क साधला. तरुणीचा विश्वास संपादन करून सुरेंद्र पाटीलने तिचा मोबाईल नंबरही मिळवला. काही दिवसांनी त्याने तरुणीला मुंबई एअरपोर्टवर नोकरी लावतो असं सांगितलं.