विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठीसक्ती निश्चित आहे पण सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही. हिंदी नको असेल, तर संस्कृत घ्या. पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील, तर अशाप्रकारची आंदोलने करूनइस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभार लावताय का याचा विचार करा. हिंदुंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत, असे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावले आहे.
( Fighting among Hindus means helping jihadistsNitesh Rane reprimands Raj Thackeray over anti-Hindi agitation)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर राज्य नितेश राणे म्हणाले, आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षडयंत्र आहे. इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आखले जातं आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय का याचा विचार करायला हवा.
समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी वारीविषयी केलेल्या वक्तव्यावर राणे म्हणाले, दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात, त्यावर आजमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरु झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर् भर असत नाही. पण तुमच्या रोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला. त्यावर अबू आजमीने आपलं थोबाड उघडावं. हे आम्ही इथे खपवून घेणार नाही. आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का?. वारीवर बोलण्याची हिंम्मत कोणी करू नये. आमची वारी अशीच सुरु राहणार. मालेगाव माजी आमदार असो किंवा औरंग्याच्या पिलावळीतील राहिलेल्यांना औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा कार्यक्रम करावा लागेल.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “गद्दार कोण ह्यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत आहे. उबाठा शिवसेनाआणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालीय, त्याला राऊत जबाबदार आहे. राऊतने स्वतःला आरशात पहाव आणि मग आरोप करावे. गुलाबराव पाटील जे बोलले ते योग्य बोलले, राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा याची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. राऊत हाच शकुनी मामा आहे.