पुणे : महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Financial fraud of five lakhs on the pretext of getting admission in college,,)
विनय डोलसे (रा. प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी नवजाद मेहेर भगवागर (वय २०, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा खुर्द, पुणे) याने फिर्याद दिली आहे.
आरोपीने फिर्यादीसोबत मैत्रीचे नाटक करून त्याचा विश्वास संपादन केला. तसेच महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्याचा बहाण्याने फिर्यादीची पाच लाखांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढीत तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.