विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाविरुद्ध कठोर प्रहार करण्याचे आदेश दिले आहेत. असून पोलिसांकडून ठिकठिकाणी मोहीम रविल्या जात आहेत. अशाच एका मोहिमेत भामरागड तालुक्यातील बिनागुंडा गावातून जवानांविरुद्ध घातपाताचा कट रचणाऱ्या पाच जहाल माओवाद्यांना मंगळवारी ताब्यात घेतले. यात तीन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गावात लपून बसलेल्या माओवाद्यांना अटक करताना पोलिसांनी गावकऱ्यांना धोका पोहोचू दिला नाही. ( Five Maoists including three women arrested after surrounding the village villagers were not allowed to reach the place threat)
अटकेतील तिघीही छत्तीसगडमधील आहेत. पाच जणांवर ३६ लाखांचे इनाम होते.माओवाद्यांच्या प्लाटून क्र. ३२ ची विभागीय समितीची सदस्य उंगी मंगरू होयाम ऊर्फ सुमली (वय २८, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर), कमांडर पल्लवी केसा मीडियम ऊर्फ बंडी (वय १९, रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर), सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (वय १९, रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर) यांचा यामध्ये समावेश आहे. एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार अशी एकूण सात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.गोळीबार करणे टाळलेलाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले. संपूर्ण गावाला घेरून पाच संशयितांना शिताफीने पकडले. गावकऱ्यांना धोका पोहोचू नये म्हणून गोळीबार न करता जवानांनी मोहीम राबवली. काही माओवादी पळून गेले.
दरम्यान पोलीस चकमकीत ठार झालेला माओवाद्यांच्या पोळीत ब्युरोचा सदस्य असलेला मिलिंद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसू (२४, छत्तीसगड) या प्लाटून मेंबरने सोमवारी आत्मसमर्पण केले आहे.