विशेष प्रतिनिधी
पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याने सांगली कारागृहात घेऊन जाताना पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. (Five policemen suspended for holding mutton party with Gaja Marane )
सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आले आहे. मोक्का कारवाई अंतर्गत गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली तुरूंगात पाठवले होते. त्यावेळी ढाब्यावर मटण पार्टी झाली होती. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदारपणे वागणुकीमुळे पुणे पोलिसांचे निलंबन करण्यात आले . गजा मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराइतासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कुख्यात गुंड मारणेच्या मटण पार्टीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. चौकशीअंती दोषी आढळलेल्या एका सहायक निरीक्षकासह एकूण सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे कठोर आदेश त्यांनी जारी केले.