विशेष प्रतिनिधी
पुणे : पूर्ववैमनस्यातून
पाच जणांनी चौघांवर कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री संत तुकाराम नगर येथे घडली.
अरमान अजीज सय्यद (२२, संत तुकाराम नगर, पिंपरी), यासिन सादिक सय्यद, साद अश्फाक शेख, अथर्व उर्फ मोन्या गंधुरे अशी जखमींची नावे आहेत.
( Four attacked with sickle knife due to past enmity)
याप्रकरणी अरमान यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वसीम शाबीर सय्यद (२६), जावेद शाबीर सय्यद (२७), रोहित कसबे (२७), फरमान सैफी (२४, पिंपरी), लाला पठाण (३०, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरमान हे त्यांच्या मित्रांसोबत टेबल गेम खेळण्यासाठी एच ए कंपनी कॅम्पस मधील वेल्फेअर सेंटर मध्ये गेले होते. तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अरमान आणि त्यांच्या तीन मित्रांना कोयता, चाकू, लाकडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी जावेद सय्यद, फरमान सैफी या दोघांना अटक केली आहे.