विशेष प्रतिनिधी
पुणे: ट्रेडिंग मध्ये चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एचएनडब्ल्यूएसीसी या ट्रेडिंग ऍपद्वारे पैसे घेऊन पिंपळे सौदागर येथील एकाची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १८ मे ते ४ जून या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.
( Fraud of Rs 32 lakhs with the promise of good profits in trading)
समीर श्रीपाद आपटे (५५) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी आपटे यांच्याशी फोनवरून संपर्क केला. त्यांना एका व्हाट्स अप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. तिथे त्यांना एचएनडब्ल्यूएसीसी या ट्रेडिंग ऍपद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगण्यात आले. त्यानुसार आपटे यांनी ३२ लाखांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना कोणताही नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.