संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांचा दावा, पोलीस तपास सुरू #SantoshDeshmukhMurder #KrishnaAandhale #NashikCrime #PoliceInvestigation #CCTVFootage #FugitiveSpotted #CrimeNews #LawAndOrder #DCNMaharashtra pic.twitter.com/du5seenmQu
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) March 12, 2025
नाशिक: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे. गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात काही नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
काय आहे नागरिकांचा दावा?
- गंगापूर रोडवरील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळे आणि त्याचा साथीदार सकाळी साडेनऊ वाजता मोटरसायकलवर फिरताना दिसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
- पोलीस तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कृष्णा आंधळेच्या हालचालींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.