पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जीबीएसचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचे खोटे ‘एसएमएस करून नागरिकांमध्ये घबराट पसरविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( A case has been registered against those who falsely sent ‘SMS’ that the filter machine in the water purification center is closed)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
जीबीएस हा विकार दूषित पाण्यामुळे पसरतो. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याने पाणी दूषित असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरामध्ये निर्जंतुकीकरण करुनच पाणीपुरवठा होत आहे .कोणतीही फिल्टर मशीन बंद नाही. नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ वर विश्वास ठेऊ नये, असे महानगरपालिका जलशुद्धीकरण केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा व त्यामध्ये बिघाड झाल्याचे ‘एसएमएस’ सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्जंतुकीकरण न करताच सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत असल्याचे खोटे एसएमएस जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरण करुन विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टी.सी.एल पावडर वापरण्यात येते.
नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत असून शहरामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा व त्यामध्ये बिघाड झाल्याचे ‘एसएमएस’ सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्जंतुकीकरण न करताच सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत असल्याचे खोटे एसएमएस जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नाही.
जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर हाऊस सुरु असून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, असे जलशुध्दीकरण केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ व माहितीवर विश्वास ठेवू नये !
“सध्या शहरामध्ये फिल्टर मशीन बंद असल्याचे व निर्जंतुकीकरण न करता पाणी सोडण्यात येणार असल्याचे ‘एसएमएस’ पाठविले जात असून यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. सध्या पाठविल्या जाणाऱ्या खोट्या ‘एसएमएस’ पाठविणाऱ्याचा शोध घेवून संबंधितांवर सायबर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.