विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती माझ्याजवळ असल्याचा धक्कादायक आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती पुढच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायला मला देण्यात आली आहे. बीड आपल्या राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे, बीड जिल्ह्याचं नाव वापरून इथे कोणी दादागिरी करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू, अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी थेट इशारा दिला आहे. काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, त्या आता पत्रकार परिषदेत बोलू शकत नाही, असेही नितेश राणेंनी म्हटलं.
राणे म्हणाले, माझ्या कृतीतून तुम्हाला यावर कसा वचक ठेवायचा हे तुम्हाला दिसेल. आम्ही मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही, आम्हाला विकत घेण्याची कोणामध्ये क्षमता नाही. नियम बाह्य काम करणाऱ्या अधीकाऱ्याला घरी बसवणार. जिल्ह्यात गेल्या काही वर्षे प्रशासनावर वचक नसल्यामुळे अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यावर येणाऱ्या काळात कसा वचक बसवतो ते पहा. आता कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महिला पकडल्या त्या एका लॉजवर पकडल्या. मात्र, त्या रेल्वे स्टेशनला पकडले गेल्याचं दाखवल. या मागचा सूत्रधार आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार. जिल्ह्याची प्रतिमा व भावी पीढीसोबत कोणी मस्ती करून दाखवावी, हे माझ ओपन चॅलेंज आहे, त्यांचा थेट सामना नितेश राणेंशी आहे.
जिल्ह्यात यापुढे कोणी ड्रग्स विकायची हिंमत करत असेल तर त्याचे हात कापले जातील. जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परजिल्ह्यातील फेरीवाले जे यु.पी. बिहारमधून येत आहेत त्यांचा येण्यामागचा हेतू काय हे यापुढच्या काळात तपासून कारवाई केली जाईल असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच, येथील खंडणी प्रकरणाली आरोप वाल्मिक कराड हेच बीडले शाडो पालकमंत्री असून बीडमधील अधिकाऱ्यांची बदली, पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांत झाल्याचं पाहायला मिळाला. त्यातच, राज्याचे मस्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट दिली. मंत्री राणेंनी येथे पत्रकार परिषद घेत अधिकाऱ्यांना राणे स्टाईलने इशारा दिला.nitesh rane
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails