विशेष प्रतिनिधी
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात आहे. यावर किती लोक ठाकरे गटात राहतील आणि टिकतील असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
राजन साळवीसारखे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. हे शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहे याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा.शेवटी राजन साळवी गेले, काल तीन खासदार आमच्या नेत्यांच्या पंगतीला होते. आज त्यांचा पक्ष सांभाळता त्यांच्यात नाकात दम येणार आहे. किती लोक राहतील व टिकतील हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे राऊतांचा जळफळाट हा कायमच राहणार आहे, असेही गायकवाड म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीवर ते म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या समोर खूप मोठ आव्हान राहणार आहे. कारण कधी नव्हे तितके काँग्रेसचे हाल जनतेने केले. काँग्रेस संपण्याच्या स्टेजवर लोकांनी आणून ठेवली आहे. ओबीसी मराठा संघर्ष पेटला आहे. कुठेतरी ओबीसी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असे म्हणतात. पण मला ओबीसी मराठा हा वाद कुठेही दिसला नाही . विधानसभेत मोठ यश मिळालं आहे. त्यामुळे कुठेही जातीयवाद दिसून आला नाही. हा देश हिंदूंचा आहे. ते जर जातीयवाद म्हणत आहे, ते त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीच लक्षण आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीवर गायकवाड म्हणाले, कोणत्याही घटना पुराव्याच्या आधारावर होत असतात. अजूनही कोणत्याही तपास यंत्रणेला पुरावा मिळाला नाही. धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही पुरावा मिळाला नाही .त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका आहे. जोपर्यंत त्यांचा सहभाग दिसून येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होणार नाही
संजय राऊत यांनी शरद पवारांवर केलेला टिकीवर हल्लाबोल करताना गायकवाड म्हणाले, शरद पवार हे देशातील खूप मोठं नेतृत्व आहे. शरद पवार यांचे मातोश्रीचे संबध सर्वांना माहित आहे. एखाद्या व्यतीच्या कामाचा सन्मान जर केला असेल तर तो त्यांचा स्वभाव आहे. संजय राऊतांना एकनाथ शिंदेंची कोणतीही चांगली गोष्ठ सहन झाली नाही. ते सदैव आमचा तिरस्कार करतात.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails