विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनीच त्रिभाषा सूत्र स्वीकारून पहिलीपासून हिंदी सक्तीची होती. यावरून शिवसेना षीने गटाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्रिभाषा सूत्र मीच स्वीकारले, मी खोटे बोललो, कमॉन किल मी असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले. (I accepted the trilingual formula I lied come kill meShinde groups protest against Uddhav Thackeray)
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाचे आंदोलन करण्याआधीच सत्ताधारी पक्षातील शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना स्वीकारला गेला होता, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी याबाबतचे पुरावेच समोर आणले होते. मात्र, त्यानंतर सत्तेतून गेल्यानंतर हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आंदोलन करत असल्याने त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
रोजगार हमी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले म्हणाले, मराठी भाषेच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची नौटंकी सुरू होती, ही वस्तुस्थिती आहे. या संबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी घेतला आहे. आमचे घाबरणारे सरकार नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही चांगले काम करत आहोत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जिथे जिथे अडचणी येतात, तिथे मार्ग काढला जात आहे. आता मराठी भाषेसंदर्भातला ठोस निर्णय आमचे तिन्ही नेते बसून घेतील. आता या विषयावर नवीन समिती नेमलेली आहे. त्यामुळे याच्यातून नक्कीच मार्ग निघेल, कोणीही काळजी करू नका.