You might also like
विशेष प्रतिनिधी
लातूर : लातूर शहरात मार्चच्या तोंडावरच पुन्हा एकदा पाणी टंचाईच्या झळा सुरु झाल्या असताना नळाला पिवळे पाणी येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पाच दिवसातून एकदा पाणी येत असल्याने नागरिक आधीपासूनच हैराण आहेत. (In Latur once in five days that too yellow water)
लातूर शहर महानगरपालिकेकडून येणारे नळाचे पाणी असे पिवळसर रंगाचे आले आहे. या अगोदरही पाच सहा महिन्यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. लातूर शहरात जवळपास सगळीकडेच असं पाणी येत आहे. प्रकाश नगर, सम्राट चौक भागात सुद्धा अशाच पद्धतीने पाणी आले आहे.
लातूर शहरात सगळीकडे एकाच टप्प्यात पाणी येत नाही. दर पाच दिवसाला वेगवेगळ्या ठिकाणी पाणी येते. पाणी खूप घाण लागत आहे अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून लातूर शहराला पाणीपुरवठा होतो. हरंगूळ येथे पाण्याचे शुद्धीकरण होते. तरीही पिवळ्या रंगाचे पाणी येण्याचे कारण काय असा सवाल नागरिक करत आहेत. पाण्याच्या गुणवत्तेबाबत महानगरपालिकेकडून कोणतीही स्पष्टीकरणे आली नाहीत, यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे.या समस्येमुळे लातूर शहरातील नागरिक आता हैराण झाले आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने या समस्येकडे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.