विशेष प्रतिनिधी
मुंबई : पूर्वी तंत्रज्ञानाची एक पिढी बदलायला 7 वर्षांचा कालावधी लागायचा, मग तो कालावधी तंत्रज्ञानामुळेच 3 वर्षांवर आला. आता एआयमुळे प्रत्येक 3 महिन्यांनी तंत्रज्ञानाची नवी पिढी तयार होते, म्हणून ‘लर्न, अनलर्न आणि रिलर्न’ हा आजचा मंत्र आहे. हा मंत्र आपलासा करण्याची क्षमता असलेलेच पुढे जातील. भारतीय विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करत आहेत आणि त्यामुळे नव्या शक्यता खुल्या होत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( In the era of AI the mantra is learnunlearn relearn asserts Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुंबई येथे एमपीएसटीएमई आणि एनएमआयएमएस इमारतींचे उद्घाटन, तसेच एसव्हीकेएम शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन केले.यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले, स्पर्धाच विकासाला चालना देते. एकदा शिखर गाठले की आणखी वर जाता येत नाही, पण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नवी उंची गाठता येते. आता आपल्या संस्थांना देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करावी लागेल. दोन-तीन वर्षांनंतर या संस्थांची परस्पर तुलनादेखील होईल – आपण कोठे आहोत, हे तपासले जाईल. ही स्पर्धा आपल्याला अधिक सक्षम करेल. आगामी काळात स्टार्टअप इकोसिस्टम अधिक बळकट करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्र आणि मुंबई भारताची स्टार्टअप कॅपिटल आहे. ‘स्टार्टअप इंडिया’च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुंतवणूक आणि ‘स्टार्टअप’ संख्येतही देशात क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र शासनाने स्टार्टअप्ससाठी ‘फंड ऑफ फंड्स’ तयार केला आहे आणि त्याद्वारे शेकडो स्टार्टअप्स उभे राहिले आहेत. तरुणांची ही ताकद आपल्याला ओळखून त्यांना पोषक वातावरण देण्याची जबाबदारी शासनासह शैक्षणिक संस्थांची आहे. या पद्धतीने आपण रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे, देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे उद्योजक घडवू,
स्पर्धाच विकासाला चालना देते. एकदा शिखर गाठले की आणखी वर जाता येत नाही, पण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नवी उंची गाठता येते. आता आपल्या संस्थांना देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करावी लागेल. दोन-तीन वर्षांनंतर या संस्थांची परस्पर तुलनादेखील होईल – आपण कोठे आहोत, हे तपासले जाईल. ही स्पर्धा आपल्याला अधिक सक्षम करेल, असे सांगूनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (NEP) आता भारताने जगातील सर्वोत्तम विद्यापीठांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये आपले कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOI) देण्यात आले. लवकरच आणखी 5 परदेशी विद्यापीठे येथे आपले कॅम्पस सुरू करतील. यामुळे एक व्यापक शैक्षणिक परिसर आकार घेणार असून आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण येथेच मिळणार आहे. यामुळे परदेशी शिक्षण परवडत नसल्यामुळे भारतातच राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल आणि परदेशात शिक्षणासाठी खर्च होणारे परकीय चलनही वाचेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे देशाच्या वैचारिक आणि मानसिक पुनरुत्थानासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत,” असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ते म्हणाले, भारताची स्वातंत्र्याची लढाई केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हती, तर शिक्षण व्यवस्थेतून भारतीय मूल्यांचा संचार करण्याची होती. ब्रिटिशांनी मॅकॉले शिक्षणपद्धती लागू करत भारताच्या पारंपरिक ज्ञान व्यवस्थेचे नुकसान केले आणि आपल्याला दासत्व मनोवृत्तीकडे ढकलले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे देशाच्या वैचारिक आणि मानसिक पुनरुत्थानासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे
नरसी मोनजीसारख्या संस्था ही केवळ शिक्षणसंस्था नसून, त्या नवभारताच्या उभारणीसाठी प्रेरणास्थान आहेत. एसव्हीकेएम संस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कणा ठरू शकणाऱ्या कॉमर्स, ट्रेडिंग व उद्योजकतेसारख्या क्षेत्रांत मोठे योगदान दिले पाहिजे. उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून केंद्रीय मंत्री प्रधान म्हणाले की, “तुम्ही केवळ विद्यार्थी नसून, नवभारताचे सेनानी आहात. विकसित भारताच्या निर्मितीत तुमचे योगदान महत्त्वाचे आहे,”