विशेष प्रतिनिधी
मुंबई: त्यांच्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळायला रूपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
( Is Rupali Chakankar Rashmika Mandana Sushma Andhares question)
विरोधक प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करतात, या रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याविषयी सुषमा अंधारे म्हणाल्या, रुपाली चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत की स्मृती इराणी आहेत? त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत. राजकारण, बॉलीवूड की प्रशासन कशातील सुप्रीम आहेत, की त्यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी वगैरे मिळते. काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतून जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर बाहेर यावे.
रुपाली चाकणकर यांचे तत्परतेने पुढे येणारे लाडके बंधू सुनील तटकरेंनी चाकणकरांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. चाकणकरांवर बोलण्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
मविआच्या नेत्यांचं एकमत झालं आहे की, महिला आयोगावर पूर्णवेळ काम करणारी अध्यक्षा द्या. पार्टी कार्यालयात जनता दरबार भरवणारी महिला काम करु शकत नाही. विशेषत: कायद्याचा परीघ माहिती असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी हवी. विद्यमान अध्यक्षा आहेत, त्यांनी कुठलीही कायद्याची पदवी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही. ईमेल पाठवण्याला त्या स्यूमोटो म्हणतात, स्यूमोटो कसा करतात त्यांना कळत नाही.
माझ्या प्रदेशाध्यक्ष पद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद याबाबत महाविकास आघाडीवाले टीका करत आहेत. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, मला महिला आयोगाचे अध्यक्षपद हे महाविकास आघाडी सरकार असताना मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी नेमकं ठरवाव त्यांना काय बोलायचं आहे ते. या आधी ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्या देखील एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. सध्या माझ्यावर टीका करणाऱ्यांमध्ये कोण आहे तर, ज्या महिला निवडणुकीनंतर बाजूला पडल्या आहेत, त्यांना कोणी विचारत नाही. त्या सध्या माझ्यावर टीका करत आहेत कारण त्यांना माहिती आहे की आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते.