विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या प्रियकराने आधी कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, यानंतर त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, यानंतर चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे. ( IT engineer girl gangraped after being lured into a trap by the lure of love)
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात प्रियकर तमीम हरसल्ला खानसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती. कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढलं. यातून पीडित तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली.
दोघंही तेथे एका हॉटेलमध्ये राहिले. यावेळी आरोपीनं पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीनं तिच्याशी जबदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तो कारने पीडितेला पुण्याला घेऊन गेला. तेथेही त्यांनी पीडितेवर अत्याचार केला. तमीमने कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या इतर तीन मित्रांना देखील बोलावून घेतले.
तिच्यावर आळीपाळीने चौघांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचारही केला. त्यानंतर तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.