विशेष प्रतिनिधी
बिकानेर : जो सिंदूर मिटाने निकले थे, उन्हें मिट्टी में मिलाया है..असा इशारा देत भारतीयांच्या रक्ताशी खेळणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत घाबरत नाही. ज्यांनी भारताचे रक्त सांडले, त्यांना प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच झालेल्या जाहीर सभेत त्यांनी तब्बल ४० मिनिटांचे भाषण देत पाकिस्तानविरोधात तीव्र भूमिका मांडली. ते म्हणाले, 22 एप्रिलला बहिणींच्या सिंदूरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पहलगाममध्ये गोळीबार झाला. हा अपमान संपूर्ण देशाने आपल्या काळजावर घेतला. तिन्ही सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आणि त्यांनी पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. पहलगाम हल्ल्यानंतर केवळ २२ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. “जेव्हा सिंदूर बारूदात बदलतो, तेव्हा काय होते ते जगाने पाहिले आहे
भारतावर हल्ला झाला तर काय उत्तर द्यायचे हे भारत ठरवेल. भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या सरकारलाही तसंच उत्तर दिलं जाईल, ही भारताची तीन धोरणे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झाली असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, मोदींचं मन थंड आहे, पण त्यांच्या नसांत गरम सिंदूर वाहतो. पाकिस्तान युद्धाने भारताला हरवू शकत नाही, म्हणून दहशतवादाचं हत्यार वापरत आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याची किंमत त्याच्या लष्कराला आणि अर्थव्यवस्थेलाही चुकवावी लागेल. चर्चा होणारच असेल, तर ती केवळ पीओके आणि दहशतवादावरच हंपीला.
पाकिस्तानने बिकानेरच्या नल एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण काहीही हानी केली नाही. उलट, त्यांचा रहिमयार खान एअरबेस आयसीयूमध्ये गेला आहे,” असा दावा करत त्यांनी मोदी यांनी भारताची सर्जिकल ताकद अधोरेखित केली. ते म्हणाले,
जो सिंदूर मिटाने निकले थे, उन्हें मिट्टी में मिलाया है।
जो हिंदुस्तान का लहू बहाते थे, आज कतरे-कतरे का हिसाब चुकाया है।
जो सोचते थे भारत चुप रहेगा, आज वो घरों में डूब-डूबकर पड़े हैं।
जो अपने हथियारों पर घमंड करते थे, आज वो मलबे के ढेर में दबे हैं।
ये शोध-प्रतिशोध का खेल नहीं, ये न्याय का नया स्वरूप है।
ये ऑपरेशन सिंदूर है, ये सिर्फ आक्रोश नहीं,
हे समर्थ भारताचं रौद्र रूप आहे.