विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. भाविक ब्रह्म मुहुर्ताची वाट बघत होते, ब्रह्म मुहुर्तावर स्नान करणं पवित्र मानलं जातं. अचानक काही भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर आले. काहीही कल्पना नसताना पाठीमागून भाविकांची गर्दी आल्याने हलकल्लोळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.महाकुंभचे पोलीस महासंचालक वैभव कृष्ण यांनी सांगितलं आहे.
(While waiting for Brahma Muhurta, 30 devotees died and 60 injured)
वैभव कृष्ण म्हणाले की भाविक ब्रह्म मुहुर्ताची वाट बघत होते, ब्रह्म मुहुर्तावर स्नान करणं पवित्र मानलं जातं. अचानक काही भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर आले. काहीही कल्पना नसताना पाठीमागून भाविकांची गर्दी आल्याने हलकल्लोळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. २९ तारखेला या ठिकाणी कुणीही प्रमुख नेते (व्हीआयपी )येणार नव्हते. आगामी दिवसांमध्ये येणाऱ्या पर्वण्यांनाही व्हीआयपी मुव्हमेंट नसणार आहे. आज मौनी अमावस्या आहे. त्यामुळे मुख्य स्नान पर्वणी आज आहे. अशातच बेला परिसरातल्या आखाड्यात गर्दीचा ओघ खूप वाढला. त्यामुळे अलिकडे उभे असलेल्या लोकांनी पुढे उडी मारण्यास सुरुवात केली. यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० मृत्यू झाले आहेत. ज्यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. तर ६० भाविक जखमी झाले आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही १९२० हा हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे.”
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. जे लोक स्नान करण्यासाठी आले होते त्यांना पहाटे ३ च्या दरम्यान स्नान करुन मौनी अमावस्येची पर्वणी साधायची होती. मात्र चेंगराचेंगरी झाली. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शाही स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली, या दरम्यान आमच्याकडचे पैसे चोरीला गेले. प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. माझ्या कुटुंबातला एक जण त्या चेंगराचेंगरीत सापडून जखमी झाला. लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होते, त्यांना कुणी अडवतही नव्हतं असे एका भाविकाने सांगितले.