विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणुकीत हरल्याने मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून देशाची बदनामी होत आहे. त्यांनी पराभवाचे आत्मचिंतन करून जनतेत जाऊन काम करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ( Losing in the elections has affected the mind Rahul Gandhi has defamed the countrythe Chief Minister advised him to go and work among the people)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ब्राउन विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात त्यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.व्यवस्थेत काहीतरी गंभीर गडबड आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. हे आता स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली. ते सातत्याने अशा प्रकारची बदल आम्ही करतात हे निंदनीय आहे. निवडणुकांमध्ये आल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतोय.
एका विरोधी पक्षाचे नेते असताना आपल्याच देशाची बदनामी विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते कोणाचा अजेंडा चालवत आहेत अशी शंका व्यक्त करत फडणवीस म्हणाले माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरून भारताची बदनाम करून त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. ते करायच्या ऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून चालले आहे. महाराष्ट्रात ते हरले, हरियाणा हरले, दिल्लीत हरले. आता मतदान प्रक्रियेवर वश्वास व्यक्त करणे बाळबोध प्रकार आहे. भारताची बदनामी त्यांनी बंद करावी असे आमचे आवाहन आहे.
दरम्यान महाराष्ट्र निवडणुकीत संध्याकाळी ५:३० नंतर अचानक ६५ लाख मतांची भर पडली, जी आकडेवारी अशक्य वाटते. इतक्या कमी वेळेत इतके मतदार मतदान कसे करू शकतात? मतदार पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते काय?”जेव्हा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली, तेव्हा आयोगाने केवळ नकार दिला नाही, तर कायदाच बदलला आणि अशा मागणीस बंदी घातली, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.