विशेष प्रतिनिधी
मुंबई ; उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या स्फोटाची जबाबदारी खालिस्तानी संघटना ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’ने स्वीकारली आहे. एका मेल द्वारे त्यांनी स्फोटाची जबाबदारी घेत पिलीभीत चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. (Khalistan Zindabad Force claimed responsibility for the Mahakumbh blast)
महाकुंभ परिसरातील ‘विवेकानंद सेवा समिती वाराणसी’च्या तंबूमध्ये आग लागून आसपासचे तंबू यात जळून खाक झाले होते. तेव्हा सिलेंडर ब्लास्टमुळेच आग लागल्याचे कारण समोर आले होते. ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’ने पाठवलेल्या मेल मध्ये असे म्हटले आहे की, यामागे कोणालाही हानी पोहोचवण्याचा उद्देश नसून केवळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा देण्यासाठीचे हे कृत्य होते. पिलीभीत चकमकीत आमच्या तीन भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ‘खालसा’ तुमच्या अगदी जवळ आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. फतेह सिंग बागी असा उल्लेखही मेलमध्ये आहे.
पिलीभीत चकमकीत तीन दहशवाद्यांचा खात्मा केला होता. यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर ग्रेनेड आणि बॉम्ब फेकल्याने ही कारवारई करण्यात आली होती. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग आणि जसनप्रीत सिंग अशी चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे असून याचा बदला घेणासाठी खलिस्तानी संघटनेने बॉम्बस्फोट केल्याचे म्हटले आहे.