पुणे – (तेजस गुजराथी) -महाराष्ट्राकडे आजही IIT बॉम्बेसारखी जागतिक दर्जाची संस्था आहे. सर्व सोयीसुविधा, प्रशस्त कॅम्पस, भरपूर निधी आणि आकर्षक पगार असूनही राज्यातील अनेक सरकारी विद्यापीठांची घसरण सुरूच आहे. या घसरणीमुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे.
दरम्यान, तामिळनाडू व कर्नाटकसारखी राज्ये सातत्यपूर्ण धोरण, गुंतवणूक आणि संशोधनावर भर देत देशात आघाडीवर पोहोचली आहेत. महाराष्ट्रानेही आता या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी राजकीय आणि वैचारिक पातळीवर नवे धोरणात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे. (Maharashtra still has a world-class institution like IIT Bombay. Despite all the facilities, spacious campuses, ample funds and attractive salaries, many government universities in the state continue to decline. This decline is a major blow to Maharashtra’s educational image. Meanwhile, states like Tamil Nadu and Karnataka have reached the forefront of the country with a focus on consistent policies, investment and research. Maharashtra also now needs to take new strategic steps at the political and ideological levels to survive in this competition.)
काय करणे आवश्यक?
- प्रोफेशनल लोकांना संधी : जे खरोखरच विद्यार्थ्यांना वास्तविक स्किल्स आणि मार्केट-रिलेटेड शिक्षण देऊ इच्छितात त्यांना आमंत्रित करणे.
- भविष्याभिमुख शिक्षक भरती : कायमस्वरूपी शिक्षकांची तातडीने भरती करून भविष्याचा विचार करून शिकवणारे शिक्षक घडवणे.
- संशोधन निधीचा वापर : उपलब्ध निधीचा व्यवस्थित आणि पारदर्शक उपयोग करून संशोधनास चालना देणे.
- अधोसंरचना सुधारणा : प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी, संशोधन केंद्रे यांसारख्या सोयीसुविधा वाढवणे.
- संलग्न महाविद्यालयांना संसाधने : राज्यभरातील शेकडो संलग्न महाविद्यालयांनाही योग्य साधनसामग्री उपलब्ध करून देणे.
महाराष्ट्राचा दहा वर्षांचा प्रवास (2015 → 2025)
- 2015 पूर्वी : महाराष्ट्र देशातील सर्वात लोकप्रिय शिक्षणकेंद्र; पुणे “विद्यार्थ्यांचे शहर”.
- 2018 : टॉप 20 मध्ये SPPU, IIT बॉम्बे आघाडीवर; एकूण 7–8 संस्था टॉप 100 मध्ये.
- 2025 : संख्यात्मकदृष्ट्या 11 संस्था टॉप 100 मध्ये, पण सरकारी विद्यापीठांची मोठी घसरण.
NIRF सुरू होण्याआधी महाराष्ट्र कुठे होता? (2015 पूर्वी)
- महाराष्ट्राला पारंपरिकपणे “शैक्षणिक हब” म्हणून ओळख मिळालेली होती.
- पुणे देशातील “विद्यार्थ्यांचे शहर” म्हणून प्रसिद्ध; देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी आकर्षित.
- SPPU (पुणे विद्यापीठ) राष्ट्रीय पातळीवर टॉप 10–15 मध्ये गणले जात होते.
- मुंबई विद्यापीठ संशोधन प्रकाशनांमध्ये देशातील अग्रगण्य.
- IIT बॉम्बे सातत्याने जागतिक QS/THE रँकिंगमध्ये अव्वल भारतीय संस्थांमध्ये.
- TISS व TIFR सारख्या संशोधन संस्थांमुळे मुंबई देशातील एक ज्ञानकेंद्र.
सरकारी संस्थांची घसरण
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) :
2018 मध्ये NIRF मध्ये 16 वा क्रमांक, 2025 मध्ये थेट 91 वा क्रमांक. - मुंबई विद्यापीठ : संशोधन प्रकाशनात एकेकाळी अग्रस्थानी असलेले, आता राष्ट्रीय क्रमवारीत मागे गेले.
- मुख्य कारणं : कायमस्वरूपी प्राध्यापकांची कमतरता, संशोधन निधीचा अभाव, अधोसंरचनेत घट.
तामिळनाडूचा धडाका
- 2025 मध्ये 17 संस्था टॉप 100 मध्ये घेऊन तामिळनाडू देशात आघाडीवर.
- कारणे : सातत्यपूर्ण सरकारी गुंतवणूक, संशोधनावर भर आणि शिक्षक भरतीतली स्थिरता.
- परिणामी तामिळनाडू आणि कर्नाटकासारखी राज्ये पुढे निघून गेली आहेत.