विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वारगेट बस स्थानाकात बलात्कार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याने सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. पुण्यात महिला जागर समितीकडून तिरडी आंदोलन करत या अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. आरोपी दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला आंदोलकांनी केली आहे. ( Mahila Jagar Samiti’s protest in Swargate rape case, protesting the statement of Minister of State for Home Yogesh Kadam)
महिलेवरील अत्याचार प्रकरणी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या वतीने शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली.स्वारगेट बलात्कार प्रकरणात महिला जागर समितीचे तिरडी आंदोलन, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचा निषेध
स्वारगेट बस स्टॅन्ड परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. पण याही पूर्वी स्वारगेट बस त्यांच्या परिसरात अनेक वेळा अशा घटना घडल्याचे बोलले जात आहे.
आंदोलनकर्त्या महिलांनी गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य हे असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी राज्यात स्त्रीयावरील अत्याचारात वाढ झाल्याचे आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुरक्षा कक्षाच्या काचा फोडल्या आहेत त्या भरुन देता येतील पण तरुणीच्या चारित्र्याच्या काचा फुटल्या त्याच काय? असा सवाल शिवसेना नेते वसंत मोरे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावरती कारवाई करण्यापेक्षा गुन्हेगारांवरती कारवाई करा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. आमच्यावरती कारवाई झाली तरी हरकत नाही अस्वलाच्या अंगावर एक केस वाढल्याने फरक पडत नाही. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी शहराच्या सुरक्षेतेकडे लक्ष द्यावं, असे मोरे म्हणाले. स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार संदर्भातील आरोपीच्या वकिलाचे स्टेटमेंट हे प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोपी ही त्यांनी केला.