अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पुण्यात वाहतुकीस मोठा बदल; पर्यायी मार्गांची माहिती जाणून घ्या (Major Traffic Diversions in Pune on Angarki Chaturthi; Check Alternative Routes Here)
वाहतुकीत झालेला बदल (१२ ऑगस्ट २०२५)
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थी साजरी झाल्यामुळे दर्शनार्थींमध्ये गर्दी वाढल्याने शिवाजी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची अडचण निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी खालीलप्रमाणे तात्पुरते वाहतूक फेरबदलाची व्यवस्था केली
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पुण्यात वाहतुकीस मोठा बदल; पर्यायी मार्गांची माहिती जाणून घ्या #PuneTraffic #AngarkiChaturthi #TrafficDiversion #PunePolice #AlternateRoutes pic.twitter.com/jFKrzzEx4S
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) August 10, 2025
बंद राहणारे मार्ग:
- शिवाजी रस्ता – पीएमपी बस, चारचाकी व जड वाहने या मार्गावरून जाण्यासाठी बंदी.
- लाल महाल चौकापासून पुढे – आवश्यकतेनुसार चारचाकी व दुचाकी वाहनांवर निर्बंध.
पर्यायी मार्ग:
- पूरम चौक → बाजीराव रोड → टिळक रोड (अलका टॉकीज चौक) → एफसी रोड यांमार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
- शिवाजी रोड → स. गो. बर्वे चौक → जंगली महाराज मार्ग → खंडोजीबाबा चौक → टिळक चौक मार्गावरुन वाहनं सुगमगत्या पुढे जाऊ शकतील.
- स. गो. बर्वे चौक → जंगली महाराज मार्ग → झाशीची राणी चौक हा मार्ग देखील पर्यायी म्हणून दिला गेला.
- अप्पा बळवंत चौक → बाजीराव रोड मार्गादेखील वापरता येईल.