विशेष प्रतिनिधी
पुणे : आळंदी पुणे रस्त्यावर माऊली पालखी सोहळ्याच्या गर्दीत तब्बल दहा जणांचे सोन्याचे दागिने चोरणारा चोरटा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. ( Man arrested for stealing jewellery from 10 people during palanquin ceremony)
शैलेंद्र मोहन पाटील (वय ६०, रा. कळंबोली, रायगड) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ संजय जाधव (वय २४, रा. शिरपूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ जाधव याने गर्दीचा फायदा घेत आरोपीने गळ्यातील फिर्यादी पाटील यांच्या गळ्यातील नऊ लाख रुपये किंमतीची नऊ तोळ्यांनी साखळी खेचली आणि घटनास्थळावरून पसार झाला. तसेच आरोपी किंवा त्याच्या साथीदारांनी आणखी नऊ जणांचे सोन्याचे दागिनेही चोरले. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.