विशेष प्रतिनिधी
जालना : हलक्यात घेऊ नका ,बेकार होईल आयुष्यभर गादीला शिवून देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.मराठा आरक्षणासाठी लढणारे आक्रमक नेते मनोज जरांगे पाटील यांनी १५ फेब्रुवारीपासून राज्यभरात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. (Don’t take it lightly, it will be hard warns Manoj Jarange to Fadnavis
अंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची सुरुवात होणार असून, त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरवले जाईल. जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानाचीही पाहणी करून तेथेही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, “फडणवीसांनी तात्काळ मागण्या लागू करतो असे आश्वासन देऊन उपोषण सोडवून घेतले. मात्र, तेरा-चौदा दिवस झाले तरी एकाही मागणीची अंमलबजावणी केलेली नाही. उलट मराठा समाजातील तरुणांवरच्या केसेस उकरून त्यांना नोटिसा पाठवत आहेत.” त्यांनी फडणवीसांना इशारा देताना असेही म्हटले की, “फडणवीसांनी मला हलक्यात घेऊ नये, बेकार होईल.
फडणवीसांनी तात्काळ मागण्या लागू करतो असं आश्वासन देऊन उपोषण सोडवून घेतलं. मात्र, तेरा चौदा दिवस झाले फडणवीसांनी एकाही मागणीच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली नाहीये. याउलट मराठ्यांच्या पोरावरच्या केसेस उकरून काढून त्यांना नोटीस पाठवत आहेत. त्यामुळं मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्य भर फडणवीसांना गादीला शिवू देणार नाही. फडणवीसांनी मला हलक्यात घेऊ नये, बेकार होईल, असा इशाराही जरांगे यांनी फडणवीसांना दिला आहे.
आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. आता लढून आरक्षण मिळवायचं आहे. एकाही विद्यार्थ्याने आत्महत्या करू नये. एका टक्क्याहून हुकलात तरी पुन्हा लढून जिंकू पण आत्महत्या कुणीही करू नका, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी केले होते.22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत गाठी भेटी नियोजन करणार, राज्यातील प्रत्येक गावातील अडचण आम्हाला समजायला हवी. 22मार्चपर्यंत आम्हाला भेटायला या असे आवाहन त्यांनी केले होते. आता यापुढील लढाई समोरा समोर असेल. लोकशाही मार्गाने सगळं केलं, गोरगरिबांना त्रास देता, आता तुमचे नाटकं बस. आता निषेध बंद. आता नीट रट्टे देणार. यांची माज मस्ती उतरवणार. आधी चूक आम्ही करणार नाही. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करू. आता आम्ही तिथून उठणार नाही, आता कायम मुंबईत बसणार. मैदान पाहणी करायला कधी जाणार याची आम्ही तारीख जाहीर करू. मुंबईत जाऊन उपोषण करणार नाही. आमची शक्ती दाखवून देऊ. आंदोलनाच स्वरूप आम्ही सांगणार नाही, असेही ते म्हणाले होते