विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात आठ विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असे वृत्त देण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही त्यात आहे. मात्र सामनामध्ये बातमी आली याचा अर्थ असं कधीच काही होणार नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे. ( Ministers resignation Sanjay Shirsat said
The news in Saamana will never mean anything!)
विरोधकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले की, तुमच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यात काही तथ्य नाही. प्रत्येक नेत्याच त्या संबंधित मंत्र्याशी बोलण झालेलं असतं. आम्ही त्या आरोपांकडे गांभीर्याने पाहत नाही.
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात वाद सुरू आहे. यावर शिरसाट म्हणाले, माझा उद्देश स्पष्ट होता, काही विषय असे असतात, एखादा निर्णय घ्यायचा ठरला, तर राज्य मंत्र्यांच्या अधिकारात तो विषय येत नाही. माझ्या सुद्धा अधिकारात ते नसतं. काही स्टेप्स आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणून सूचना अशी केलेली की, तुम्हाला बैठका घ्यायच्या असतील तर मला कल्पना द्या. तुम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार असाल, तर माझी समती आहे. पुन्हा फाईल फिरवा असे प्रकार टाळण्यासाठी सहकारी म्हणून मी त्यांना अशी सूचना केली होती.
यात वादविवाद असण्याचं कारण नाही. मला कल्पना द्या अशी सूचना केली. सारखं, सारखं पत्रव्यवहार करणं माझ्या स्वभावात नाही. मला सूचना करायची होती, मी केली. त्यांनी त्यांचं उत्तर दिलय. कोणतातरी वाद निर्माण झालाय असं समजण्याच कारण नाही.
आमच्या महायुतीत दरी पडलीय असं समजण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. माझी काही हरकत नाही.
रोहित पवार यांनी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत यावर शिरसाट म्हणाले , रोहित पवार यांना काय करायचय. आमचे फोन टॅप होतायत की नाही ते आम्ही पाहू. असं करण्याची आवश्यकता काय?. सरकार आमचं आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत. फोन टॅपिंग का होईल?. रोहित पवार बेसलेस गोष्टी बोललेत. सत्ताधारी आमदारांमध्ये चलबिचल कशी होईल म्हणून त्यांनी हे केलय. सरकार प्रगतीच्या दिशेने चाललं आहे. आम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही.