विशेष प्रतिनिधी
नागपूर : विधिमंडळात लक्षवेधी लावण्याची धमकी देऊन राईस मिल चालकांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. राईस मिल चालकांना धमकावण्यात येत असून पैशांचा व्यवहार करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. ( MLA Phuke alleges blackmailing by opposition MLAs by threatening question in legislature )
पत्रकारांशी बोलताना फुके म्हणाले, विरोधात प्रश्न लावू. प्रश्न लावायचे नसतील, तर आम्हाला पैसे द्या, अशी ब्लॅकमेलिंग विरोधी पक्षातील नेत्यांच्या एजंटकडून केली जात आहेत. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. त्यासह विरोधात प्रश्न लावू. प्रश्न लावायचे नसतील, तर आम्हाला पैसे द्या, अशी ब्लॅकमेलिंग विरोधी पक्षातील नेत्यांच्या एजंटकडून केली जात आहे. याचे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहेत. यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे.
याची आधी पोलिसांकडून चौकशी करण्यात येईल. गरज पडली, तर एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. आठ ते दहा लोक यात सामील आहेत. विरोधी पक्षातील सगळे आमदार यात नाहीत. काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एका नेत्याचा डावा आणि उजवा हात सुद्धा यात सामील आहे,” असे परिणय फुके यांनी सांगितले.
विधानसभेत प्रश्न लावण्याच्या दोन दिवसा आधीच्या काही ऑडिओ क्लिप पुढे आल्या आहेत. काहींचे फोनवर संभाषण देखील झाले. या राईस मिल मालकाच्या कार्यालय एजंटसारखे असलेले लोक हा प्रश्न का लावायचा नाही, लावल्यावर काय होणार? अशा प्रकारच्या धमक्या देत असल्याचे ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहेत. आपण गृहमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे, असेही डॉ. परिणय फुके यांनी सांगितले आहे.
ऑडिओ क्लिपची फॅारेंसीक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत. आत्ताच कोणाचे नाव घेणार नाही. विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते सहभागी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 100 ते 150 राईस मिल्स पैकी निवडक सात राईस मिल्सची नावे लक्षवेधीत घेण्यात आली आहेत असा आरोप फुके यांनी केला