विशेष प्रतिनिधी
पुणे : मोशी येथील एकाला अनोळखी व्यक्तींनी फोन केला. फोनवरील व्यक्तींनी मुंबई क्राईम ब्रांच आणि फायनान्स विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंगची केस असल्याचे सांगत त्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून ५२ लाखांची फसवणूक केली.
( Money laundering case Fraud of Rs 52 lakhs by fear of arrest)
संताजी घोरपडे आणि जॉर्ज मॅथ्यू असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील एकाला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने तो मुंबई क्राईम ब्रांच मधून संताजी घोरपडे आणि फायनान्स विभाग प्रमुख जॉर्ज मॅथ्यू असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या बँक खात्यात असलेल्या पैशांबाबत मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. बँक खात्यातील रकमेची फायनान्स विभागाकडून पडताळणी करून ती परत फिर्यादी यांच्या खात्यात भरण्यात येईल, असे सांगून फिर्यादीकडून ५२ लाख ५९ लाख रुपये घेतले. त्यानंतर ते पैसे पुन्हा फिर्यादी यांच्या बँक खात्यात न भरता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.