विशेष प्रतिनिधी
DHANANJAY Mundeमुंबई : धनंजय मुंडे यांनाही आत टाका, सरकारी जेवण जेवू द्या, अशी मागणी त्यांच्या मामी सारंगी महाजन यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ( Munde in too, let him eat government food.)
पत्रकारांशी बोलताना सारंगी महाजन म्हणाल्या, लोकांच्या मनातली दहशत मिटवण्याचा प्रयत्न करा. धनंजय यालाही आता आत टाका, थोडे दिवस त्याला बसू द्या. हवा खाऊ द्या. सरकारी जेवण जेवू द्या. बीड जिल्ह्याचं तो नेतृत्व करतोय, मग त्याने नैतिक जबाबदारी समजून पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. अजूनही वेळ गेली नाही, तो राजीनामा देऊ शकतो. त्याने स्वतःहून आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायला हवा.
महाजन म्हणाल्या की, “धनंजय यालाही आता आत टाका, थोडे दिवस त्याला बसू द्या, हवा खाऊ द्या, सरकारी जेवण जेवू द्या. बीड जिल्ह्याचं तो नेतृत्व करतोय, मग त्याने नैतिक जबाबदारी समजून पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. अजूनही वेळ गेली नाही, तो राजीनामा देऊ शकतो. त्याने स्वतःहून आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायला हवा.
त वाल्मीक कराडची दहशत लोकांच्या मनात बसली आहे, ती मिठवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे याने करावा, हा सल्ला मी त्याला देईल. सध्या त्याचं हेलीकॉप्टर – विमान हवेत आहे, ते – उतरवण्यासाठी बीडची सामान्य जनता मदत करेल, अशितिका महाजन यांनी केली.
सारंगी महाजन यांचे पती प्रवीण महाजन हे दिवंगत प्रमोद महाजन यांचे भाऊ होते. गोपीनाथ मुंडे हे प्रमोद महाजन यांचे मेव्हणे असल्याने नात्याने सारंगी महाजन या धनंजय मुंडे यांच्या मामी आहेत. प्रवीण महाजन
यांनी 22 एप्रिल 2006 रोजी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांचे बंधू होते. यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर प्रवीण महाजन काही काळ तुरुंगात होते. ते 2021 साली पॅरोलवर सुटून बाहेर आले असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
धनंजय आणि पंकजा या दोन्ही मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून जबरदस्तीने आपली कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली असल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला होता. प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतली असे त्या म्हणाल्या होत्या.
[10:20 am, 19/1/2025] Harshu: