विशेष प्रतिनिधी
पुणे : माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका,. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत. ( My child had gone But dont throw such bad things at her demanded Vaishnavis father crying profusely.
सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवीवर हगवणेंच्या वकिलांनी अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. दरम्यान, वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. ते ढसाढसा रडले.
कस्पटे म्हणाले की, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे चुकीचे आहे. मोबाईल मधील चॅट बाबत आम्हाला कोणतीही पुसटशीही कल्पना कोणीच दिलेली नाही. उलट माझ्या जावयाला मी एक लाख 52 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला. या मोबाईलचे हप्ते मी आजही फेडत आहे.
हगवणे कुटुंबाकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र हा दावा कस्पटे यांनी फेटाळून लावला आहे. त्यांच्याकडे केवळ एकच गाडी असून मी दिलेली फॉरर्च्युनरगाडी त्यांनी मागितली होती. मी आधी दुसरी गाडी बुक केली होती. मात्र त्यांना गाडी हवी होती. मला तीच द्या नसता मी गाडीला हाथ लावणार नाही, असे त्यांनी मला सांगितले होते.
हगवणे यांनी वैष्णवीची दोन लग्न मोडली करताना कस्पटे म्हणाले, या विषयी मी सध्या काही जास्त बोलू शकत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आपली सून मयत झाली हे सोडून हगवणे यांना बाळाला नीलेश चव्हाणकडे देणे कसे सुचले? बाळ वैष्णवीच्या जवळच घरात होते. मग ते बाळ नीलेश चव्हाणकडे कसे पोहोचले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. नीलेश चव्हाण देखील माझ्या वैष्णवीच्या खुनाच्या कटात सामील आहे, असा माझा ठाम आरोप आहे.
वैष्णवी हगवणेला मृत्यूपूर्वी सलग 8 दिवस वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करुन पती शशांकने मारहणा केल्याचे पोलिस तपासात समोर आले. याविषयी बोलताना वैष्णवीचे वडील म्हणाले, ‘सहा ते सात दिवस वैष्णवीला सलग मारहाण झाली. १० तारखेला वैष्णवी घरी आली होती. तेव्हा ती आईला याविषयी बोलली होती. मारहाण होत आहे, छळ करत आहेत. पण नवऱ्याचा शशांकचा फोन आल्यावर तिला दुसऱ्याच दिवशी जावं लागलं होतं.