विशेष प्रतिनिधी
शिर्डी : शिव्या घालणे, चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम आहे. म्हणून पक्ष आवळत चाललाय. म्हणूनच शिवसेना संपली.पुढच्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष राहत नाही, असा हल्लाबोल माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. ( Narayan Rane said thats why Shiv Sena ended
शिर्डीत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाने वक्फला विधेयकाला विरोध केला, असा प्रश्न विचारल्यावर नारायण राणे म्हणाले, “राम नवमीसारख्या चांगल्यादिवशी नको, त्या माणसाचे नाव घेत आहात. . विकास, समृद्धी आणि लोकहित हे उद्धव ठाकरेंचं काम नाही. वक्फ कायदा हा कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही. वक्फच्या नावाने जो दुरूपयोग चालला आहे, तो थांबवावा आणि मुस्लीम समाजात जे गरीब लोक किंवा तलाक झालेल्या महिला आहेत, त्यांचे पुर्नवसन व्हावे, त्यांना शिक्षण मिळावे, हा समाज देखील प्रगत समाजाबरोबर जावा, त्यादृष्टीने वक्फ विधेयक आणले.
मी 39 वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे असताना पक्ष होता. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपली, अशी टीका राणे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात चांगले काम सुरू आहे. विरोधकांकडे दुसरे काही काम राहिले नाही. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे,” असे राणे यांनी सांगितले.