पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील कुख्यात आरोपी निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला निलेश चव्हाण याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी पाच विशेष पथकांची नियुक्ती केली होती. त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला पकडण्यात यश मिळवले. ( Nilesh Chavan the accused in Vaishnavi Hagavane suicide case arrested at Nepal border)
निलेश चव्हाण हे नाव वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वारंवार चर्चेत आले होते. वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे त्याचा सहभाग असल्याचे आरोप नातेवाईकांनी केले होते. पोलिस तपासात देखील त्याच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात होते. या प्रकरणात आधीच तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे हे कोठडीत आहेत.
फरार झाल्यानंतर निलेश चव्हाणने आपले मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद करून पोलीस तपासाच्या कक्षा चुकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांच्या माहितीद्वारे त्याचा माग काढत नेपाळ बॉर्डरपर्यंत पाठलाग केला. अखेर गुरुवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली.
पोलिस आता निलेशला पिंपरी-चिंचवडमध्ये आणून न्यायालयात हजर करणार आहेत. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकी देणे आणि मानसिक त्रास देणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश चव्हाणला वैष्णवीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी सह आरोपी केलं आहे. वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. त्याच्याविरोधात त्याच्या बायकोने 2022 ला छळवणुकीची तक्रार दिली होती. स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह्य व्हिडीओ शूट केल्याबद्दल पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
राज्यासह देशभरात पोलिसांकडून शोध सुरु
निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार होता. फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते.
पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलशे चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. त्याच्याविरोधात त्याच्या बायकोने 2022 ला छळवणुकीची तक्रार दिली होती. स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह्य व्हिडीओ शूट केल्याबद्दल पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हुसकावून लावले होते . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे.