विशेष प्रतिनिधी
मुंबई: कुणाल कामराने काहीही चुकीचं केलेलं नाही. कुणाल कामराने सत्य मांडलं. जे चोरी करतात ते गद्दारच अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सत्य बोलणं हा स्वातंत्र्यावरील हल्ला नाही असेही ते म्हणाले.
( Only traitors steal, Kunal Kamra told the truth, Uddhav Thackeray criticizes)
उद्धव ठाकरे म्हणाले, त्याने सत्यात्मक गाणं केलं आहे. सत्य आहे त्या जनभावना त्याने मांडल्या आहेत. आम्ही आजही बोलतोय की जे चोरी करतात ते गद्दार आहेत. मी प्रथम महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की, काल कामराच्या इथे जी तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केली नाही. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. ती कदाचीस एशिंशि (एकनाथ शिंदे शिवसेना) गटाने केली असेल, गद्दार सेनेच्या एशिंशि गटाने केलेली असेल. मुळात जे राज्य चाललंय शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चाललंय की गद्दारांच्या आदर्शाने चाललंय आहे, याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे.
कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केल्याच्या घटनेचा निषेध करताना ठाकरे म्हणाले, “काल जे भेकड लोकं आहेत, त्यांना त्या गाण्यावरून त्यांच्या तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोशारींनी अपमान केला होता तेव्हा कोशारींचा निषेध करण्याचा यांच्यात धाडस नाही. हे भेकड लोकं आहेत आणि गद्दारच आहेत. त्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं आहे असं माझं मत नाही. कुणाल कामराने जनभावना व्यक्त केल्या आहेत.
गद्दार आणि चोर नाहीत मग मिरची का लागली? कामराने काय म्हटलं ज्यामुळे मिरची लागली ते शिंदेंनी सांगावं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. फडणवीस अकार्यक्षम हे दाखवण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.