विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेतील सर्वपक्षीय बैठकीत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईविषयी माहिती दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने ९ ठिकाणी केलेल्या हल्ल्यात किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. ( Operation Sindoor is still ongoing 100 terrorists have been eliminated says Defence Minister Rajnath Singh)
राजनाथ सिंह म्हणाले की, “ही कारवाई अजून सुरू असून त्याबाबत सविस्तर सादरीकरण सध्या करता येणार नाही भारताने तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकिस्तानकडून काही हालचाल झाल्यास भारत माघार घेणार नाही.
या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दर्शवतानाच खास संसद अधिवेशन बोलविण्याच्या काँग्रेसच्या मागणीवरही पुन्हा भर दिला.
राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले त्याप्रमाणे, त्यांनी सरकारने)म्हटले की काही गोष्टी आहेत ज्यांवर आपण चर्चा करू इच्छित नाही
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूरसाठी मी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सरकारचे कौतुक केले आहे. आपण रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेविरुद्ध जागतिक मोहीम सुरू केली पाहिजे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, “सर्व राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला असून, संकटाच्या या काळात कोणीही राजकारण करू नये. आपले राजकारण फक्त सरकार स्थापनेसाठी नाही, तर देश घडवण्यासाठी आहे.”
सध्या पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असून, भारताच्या या कारवाईनंतर संपूर्ण देशात एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.