श्रीनगर – काश्मीरमधील निसर्गरम्य आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. Pahalgam Terrorist Attack: 26 tourists from India and abroad killed, including 6 from Maharashtra; one Nepali citizen also among the deceased. हे सर्व पर्यटक देशाच्या विविध राज्यांतील आणि परदेशातील होते, जे काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद लुटत असताना या भीषण हिंसाचाराचा बळी ठरले.
दहशतवाद्यांनी खास करून पुरुष पर्यटकांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी महिलांवर हल्ला केला नाही. मृतांमध्ये भारतातील अनेक राज्यांतील तसेच परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू
हल्ल्यात मुंबईतील हेमंत सुहास जोशी, अतुल श्रीकांत मोनी, संजय लक्ष्मण लाली, दिलीप देसाली, तसेच पुण्यातील संतोष जगडा आणि कस्तुबा गाववते या सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातचे वडील-मुलगा हल्ल्यात ठार
गुजरातच्या भावनगर येथील यतेश परमार आणि त्यांचा मुलगा सुमित परमार, तसेच सुरतचे शैलेशभाई हिम्मतभाई कलाठिया हे या दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले.
शहीद लेफ्टनंट विनय नरवाल
या हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले. केवळ पाच दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेले 26 वर्षीय नरवाल हे हरियाणातील कर्नालचे रहिवासी होते. नवविवाहित पत्नीसमवेत रजेवर असताना ते काश्मीरला गेले होते. मात्र त्यांच्या आयुष्याला ही हिंसक घटना पूर्णविराम ठरली.
इतर राज्यांतील बळी
या हल्ल्यात इंदूरचे सुशील नथानिएल, पहल्गामचाच रहिवासी सय्यद आदिल हुसेन शाह यांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा, ओडिशा, केरळ, चंदीगड, कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेशमधील नागरिकही या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.
परदेशी नागरिक नेपाळचा सुदीप न्यौपाने याचाही यात मृत्यू झाला.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह या हल्ल्यानंतर केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनावर सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटकांची सुरक्षितता हा प्रमुख मुद्दा ठरत असून, अशी घटना पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करते. केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, राष्ट्रीय तपास यंत्रणाही या प्रकरणाचा तपास करीत आहे.
निषेध आणि शोक या दुर्दैवी घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील 60 पेक्षा अधिक पर्यटक काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती हल्ल्यानंतर अजूनही 60 पेक्षा अधिक महाराष्ट्रातील नागरिक श्रीनगरमध्ये अडकले असून, सरकारकडे त्यांनी तातडीच्या बचावकारवाईची मागणी केली आहे. यामध्ये बहुतांश नागरिक पुणे जिल्ह्यातील आहेत. प्रशासनाने या नागरिकांना प्राधान्याने सुरक्षित स्थळी हलवावे, अशी विनंती त्यांच्याच नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
अडकलेल्या नागरिकांची यादी: ज्योति जुरुंगे, आदित्य जनार्दन खटटे, जनार्दन बबन खटाते, मनीषा जनार्दन खटाटे, काजल आदित्य खटाटे (काजल रमेश पोरे), ज्ञानेश्वर जावलकर, साधना जावलकर, नीलेश उंबरकर, ज्योति उंबरकर, आर्या उंबरकर, भूमि उंबरकर, प्रसाद सावंत, दीपा डी सावंत, दीपा पी सावंत, राकेश टकले, अश्विनी टकले, सिद्धांत टकले, सुनील निकम, रेखा निकम, दीपाली गायकवाड, वैष्णवी गायकवाड, तेजश्री गायकवाड, मनीषा गायकवाड, निर्मला अदक, वैशाली धगते, किरण वाग्मोडे, समशेर शेख, शाइन शेख, सिद्धिक शेख, शिरीष देशमुख, भाग्यश्री देशमुख, प्रज्वल कुलल, अश्विनी फुटाने, नासिर शेख, विनोद यादव, कोमल यादव, अमोल हंबीर, मोना हम्बीर, आरोही हंबीर, गोविंद यादव, ज्योति यादव, कैवल्य यादव, अमोल म्हस्के, स्वप्नाली म्हस्के, वर्षा कंचन, आर्या कंचन, युवराज होल, तेजश्री छिद्र, तनिष्क होल, चित्राक्ष छिद्र, सविता लोनकर, सतीश गायकवाड, दर्शन गायकवाड, प्ररज्वल कुतवल, संध्या देडगे, शौनक डेज, रोहिणी गायकवाड, आदित्य गायकवाड, प्रथमेश जुरुंगे, शालिनी नागेकर, श्रद्धा काले, साई काले, शेहा कुलाल, अलका कुदाले, कल्पना गायकवाड, सुषमा शिंदी, रूपाली तांबे, दीपाली लोखंडे.
सरकारने या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीचे पावले उचलावीत, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
हल्लेखोरांचा फोटो समोर; पहलगाम हल्ल्यानंतर शोध मोहीमेस वेग, एनआयए सक्रिय