विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर चार विजयी उमेदवारांविरुद्ध दाखल याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. याचिका दाखल करताना प्रफुल्ल गुडधे-पाटील यांच्यासह चार पराभूत उमेदवार न्यायालयात गैरहजर असल्यामुळे न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी पाचही उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या. ( Petition against Chief Minister Devendra Fadnavis dismissed)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे- पाटील, तसेच काँग्रेसचे दक्षिण नागपूर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव, सतीश वारजूरकर,
संतोष रावत आणि सुभाष धोटे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकांवर जूनमध्ये हायकोर्टान (क्लोज फॉर ऑर्डर) निर्णय राखून ठेवला होता. निवडणूक याचिका दाखल करताना उमेदवार हजर नव्हते. त्यामुळे हायकोर्टाने नोटीस बजावल्या होत्या. याचिकाकर्ते हे
निवडणूक याचिकाकर्त्यांमध्ये पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, सतीश वारजूरकर, सुभाष धोटे, संतोषसिंग रावत यांचा समावेश आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुडघे, दक्षिण नागपूरमधून जिंकलेले आमदार मोहन मते यांच्याविरुद्ध पांडव, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले आ. भांगडिया यांच्याविरुद्ध वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेले सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध रावत, राजुरा येथून जिंकलेले देवराव भोंगळे यांच्याविरुद्ध धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती.
वैयक्तिकरीत्या हजर असायला पाहिजेत, ते वकिलांमार्फत हजर राहू शकत नाहीत. याचिकांमध्ये एक जरी चूक असली तरी सर्व याचिका खारीज होण्याची शक्यता हायकोर्टाने निर्णय राखून ठेवल्यानंतर वकिलांनी व्यक्त केली होती. वकील गैरहजर असल्याचे कारण हायकोर्टान याचिका फेटाळून लावताना दिले असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे अॅड. सुनील मनोहर, अॅड. उदय डबले, प्रफुल्ल गुडधे व इतर याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. महमूद प्राचा, अॅड. आकाश मून, अॅड. पवन डहाट यांनी बाजू मांडली