विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पोलिसांनी कुख्यात गज्या मारणे टोळीवर कारवाई करत गजा मारणे आणि त्याच्या टोळीच्या एकूण १५ गाड्या जप्त केल्या आहेत. ( Police crack down on Gaja Marane gang15 luxury cars seized)
ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली असून, टोळीचा प्रमुख गज्या मारणेसह त्याच्या टोळीतील सदस्यांच्या मालकीच्या गाड्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ टोयोटा फॉर्च्युनर, १ महिंद्रा थार, १ टाटा नेक्सन यासह आणखी ४ अलिशान चारचाकी गाड्या आणि काही दुचाकींचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गाड्या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरण्यात येत होत्या, त्यामुळे त्या जप्त करण्यात आल्या आहेत.