विशेष प्रतिनिधी
पुणे : हनी ट्रॅपवरून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आरोप करत असताना त्यांच्या जावयालाच महिलांसोबत रेव्ह पार्टी करताना ताब्यात घेण्यात आले आहे. ( Police raid rave party in Pune Eknath Khadses son-in-law Pranjal Khewalkar arrested)
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही रेव्ह पार्टी सुरू होती. एकनाथ खडसे यांचा जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरु होते. खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती.३ महिला आणि २ पुरुषांचा यामध्ये समावेश होता. एका लॉज मधील फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती.