विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश त्याला ऐकत होता… या भाषणानंतर मोठमोठ्या दिग्गजांनी त्याची पाठ थोपटली…मित्रा खूप मोठा झाला आहेस. असाच होत राहशील, अशा शब्दांत सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या जिवलग मित्राने पाठ थोपटली आहे. ( Praveen Tarde was overwhelmed by his best friends speechPunekars praised him by calling him Muralidhar their beloved.)
देशातील पहिलं सहकारी विद्यापीठ असलेल्या ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चं विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालं आहे. राज्यसभेत सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विधेयक मांडून चर्चेस उत्तर दिलं. मोहोळ यांच्या ४० मिनिटांच्या भाषणाचे कौतुक होत आहे. त्यांचे जवळचे मित्र व मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पोस्ट शेअर करत आपल्या मित्राचं भरभरून कौतुक केलं आहे.
माझा लाडका दोस्त आज देशाचा लाडका झाला. देशाच्या सर्वोच्च सभागृहात आज तो बोलत होता तेव्हा त्याचा अख्खा प्रवास आठवला…
मुळशीच्या मुठा गावातील जिल्हा परिषदेची शाळा… शाळा सुटल्यावर स्वतःच्याच ऊसाच्या गुऱ्हाळात वडिलांना मदत…त्यानंतर मोठ्या कष्टाने कोल्हापूरमध्ये कुस्ती प्रशिक्षण शिवाय कुस्ती शिकता-शिकता कला शाखेची पदवी… त्यानंतर भाजपासारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात राजकीय पार्श्वभूमी नसताना एक कार्यकर्ता म्हणून प्रवेश आणि मग तीस वर्षांच्या एका कार्यकर्त्याचा प्रामाणिक संघर्ष आज दिल्लीत सोन्यासारखा चमकला.. पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश त्याला ऐकत होता… या भाषणानंतर मोठमोठ्या दिग्गजांनी त्याची पाठ थोपटली…मित्रा खूप मोठा झाला आहेस असाच होत राहशील.. कारण ही फक्त सुरुवात आहे…
प्रवीण तरडे आणि मुरलीधर मोहोळ हे नात्याने मावसभाऊ आहेत. लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांच्या प्रचारासाठी तरडे उतरले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, मुरलीधर मोहोळ यांचं प्रविण तरडे यांनी कौतुक केलं. मुरलीधर मोहोळ मावस माझा भाऊ आहे. नात्यागोत्यातला माणूस जर उभा असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभ राहिला पाहिजे.त्यामुळे माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेलो आहे. त्याच्यासाठी प्रचार केला.